वीर महान WWE मधील साधू पहेलवान

Bharat Jadhav

May 11, 2022

रिंकू सिंह उर्फ वीर महान

द ग्रेट खलीनंतर वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमध्ये अजून एक भारतीय कुस्तीवीराचं नाव चर्चेला येत आहे. रिंकू सिंह उर्फ वीर महान याच्या समोर अनेक परदेश रेसलर मात खात आहेत.

Credit: Instagram

मोठ-मोठ्या दिग्गजांना पाजलं पाणी

रिंकूचा देशी लूक लोकांच्या पसंतीस पडू लागला आहे. कारण रेसलिंक रिंगमध्ये ते याच अवतारात उतरत असतात. याच रुपात त्यांनी अनेक दिग्गजांना मात दिला आहे.

Credit: Instagram

वीर महानचा देशी लूक

रिंकू सिंहच्या गळ्यात रुद्राक्ष माळ, कपाळावर टिळा आणि खांद्यावर नेहमी रुमाल असतो.याचबरोबर त्यांच्या छातीवर आई असं लिहिलं असतं. त्यांचा हाच लूक लोकांना खूप आवडत आहे.

Credit: Instagram

यूपीमध्ये रहणारे आहेत रिंकू सिंह

रिंकू सिंह यांचा जन्म 8 ऑगस्ट 1988 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. मुळात तेभद्रोही जिल्ह्यातील होलपूर गावाचे रहिवाशी आहेत.

Credit: Instagram

भारदस्त रुबाब

33 वर्षाचे रिंकू यांची उंची 6 फूट 4 इंच आहे. तर त्यांचे वजन 125 किलो आहे.

Credit: Instagram

भालाफेक मध्ये ज्यूनिअर नॅशनल पदक

रिंकू सिंह हे आधी भाला फेकचा खेळ खेळत होते. यात त्यांनी ज्यूनिअर नॅशनल पदक पटकवलं आहे.

Credit: Instagram

बेसबॉल

वर्ष 2008 मध्ये त्यांनी एका रिऑलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. तो शो बेसबॉल टॅलेट हंट शो होता. वीर सिंह टॅलेंट शो मध्ये विजेते ठरले होते.

Credit: Instagram

2018 मध्ये WWE शी जुडले

2018 मध्ये ते बेसबॉल सोडून रेसलिंगच्या रिंगमध्ये उतरले.

Credit: Instagram

स्वत ठेवलं वीर महान नाव

रिंकूने एक संघ बनवला, परंतु काही कारणामुळे 2021 मध्ये ते संघापासून वेगळे झाले. परत पुन्हा ते WWE शी जुडले. आणि आपलं नाव त्यांनी वीर महान ठेवलं

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पृथ्वी शॉने मुंबईतील वांद्रे येथे खरेदी केले आलिशान घर, किंमत ऐकून होश उडाणार