May 9, 2022
भारताचे माजी क्रिकेटर अरुण लाल यांनी66 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे.
Credit: Twitter
बुलबूल साहा ही त्यांची दुसरी पत्नी असून ती वयाने अरुण लाल पेक्षा 28 वर्ष लहान आहे.
Credit: Twitter
बुलबूल ही पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे राहते. तिचं वय 38 वर्ष असून ती शिक्षिका आहे.
Credit: Twitter
रिनाने अरुण लाल यांना दुसरं लग्न करण्यास परनवागी दिली होती. लग्नानंतर दोघेही रिनाची काळजी घेत आहेत.
Credit: Twitter
अरुण लाल यांचं पहिलं लग्न रिनाशी झालं होतं. परंतु वाद होत असल्यानं त्यांनी एकमेंकांना घटस्फोट दिला.
Credit: Twitter
दरम्यान घटस्फोट झाल्यानंतरही रिना ही अरुण लाल यांच्यासोबत राहते. परंतु ती सध्या दीर्घकाळापासून आजारी असून अरुण लाल तिची काळजी घेत आहेत.
Credit: Twitter
अरुण लाल यांनी 1982 मध्ये इंग्लंडच्या विरुद्धात भारतीय संघात पदार्पण केलं होतं. त्यांनी एकदिवशीय सामने आणि कसोटी सामन्यातही पदार्पण केलं होतं. वर्ष 1989 पर्यंत अरुण लाल भारतासाठी खेळले. त्यांनी 16 कसोटी आणि 13 एकदिवशी सामने खेळले आहेत.
Credit: Twitter
सात वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये 16 कसोटी सामन्यात 26.03 च्या सरासरीने 729 धावा केल्या. ज्यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 13 एकदिवशीय सामन्यांमध्ये त्यांनी 9.38 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत.
Credit: Twitter
सन 1988 मध्ये बंगालला 51 वर्षानंतर रणजीचं पुरस्कार जिंकून देण्यात अरुण लाल यांचं खूप महत्वाची भूमिका होती. मुंबईविरुद्धात क्वार्टर फायनल मध्ये 189 धावा करत त्यांनी बंगालच्या संघाला सेमीफायनलमध्ये नेलं होतं.
Credit: Twitter
देशांर्गत क्रिकेटमध्येअरुण लाल यांची कामगिरी खूप भारी होती. प्रथम श्रेणीच्या सामन्यांमध्ये त्यांनी 46.94 सरासरीनुसार 10,421 धावा केल्या. या दरम्यान त्यांनी 30 शतके केली आणि 43 अर्धशतके केली आहेत. त्यांचा सर्वाधिक स्कोअर हा 287 धावांचा होता.
Credit: Twitter
सध्या अरुण लाल हे बंगालच्या रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
Credit: Twitter
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद