Crime: आई न तू वैरिणी, पतीचा बदला घेण्यासाठी आपल्या पोटच्या मुलाची केली निर्घृण हत्या, आणि नंतर केले हे कृत्य

Mother Burtley Killed Her Child: आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिने आपला गुन्हाही मान्य केला आहे. तिने आपल्या मुलाची निर्घृण हत्या करत, नंतर त्याच्या शरीराचे तुकडे केले.

Updated Jun 3, 2023 | 08:46 PM IST

Mother 'hacks five-year-old son to death with a machete before boiling and eating part of his head'

आईने केली आपल्या 5 वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या (प्रतीकात्मक छायाचित्र)

Egypt: एका आईने आपल्या अवघ्या 5 वर्षाच्या मुलासोबत जे कृत्य केले ते पाहून कुणाचेही काळीज हेलावून जाईल, या महिलेने आपल्या मुलाची मोठ्या आकाराच्या चाकूने हत्या केली. ही महिला एवढ्यावरच थांबली नाही, तर पुढे त्याच्या शरीराचे तुकडे छिन्नवीछीन्न करत निर्दयीपणाचा कळस गाठला. तिने त्याच्या डोक्याचा काही भाग शिजवून खाल्ला. तसेच मृतदेहाचे काही तुकडे पुरण्यासाठी जात असताना तिला पकडण्यात आले आहे. आई या सुंदर व्याख्येला गालबोट लावणारा हा प्रकार इजिप्त मध्ये घडला आहे.
या आरोपी महिलेचे वय २९ वर्षे असून तिचे नाव हाना मोहम्मद हसन आहे. तपासात या महिलेचा गुन्हा सिद्ध झाला असून, तिला तिच्या पूर्व पतीला आणि त्याच्या कुटुंबाला भेटीचे अधिकार किंवा मुलाशी कोणताही संपर्क होण्यापासून रोखायचे होते, आणि त्यासाठी तिने हे हिंसक कृत्य केले असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी महिलेला कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार नसल्याचीही माहिती मिळाली आहे. ज्यामुळे, तिने मुद्दामून मुलगा युसूफचा जीव घेतला. याप्रकरणी तिला सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, हानाने आपल्या मुलाच्या डोक्यावर शस्त्राने तीन वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. मात्र, त्याला दफन करण्यापूर्वीच तिला अटक करण्यात आली. तिने कथितरित्या मुलाचे डोके आणि इतर भाग चुलीवर उकळत्या पाण्यात शिजवले, तसेच घराच्या बाथरूममध्ये कसायाप्रमाणे मुलाच्या शरीराचे तुकडे केले आणि खाल्ले.

जाणीवपूर्वक केला गुन्हा

युसुफच्या काकांना घरातील बादलीत शरीराचे अवयव सापडले तेव्हा ही घटना उघडकीस आल्याचे वृत्तात म्हटले आहे. तपासानुसार, घटनेच्या वेळी हाना पूर्ण शुद्धीत होती. तिच्यावर कोणत्याही प्रकारच्या ड्रगचा परिणाम झाला नव्हता. आरोपी महिलेला अटक केल्यानंतर तिने स्वत: आपल्या मुलाच्या मृतदेहाची केलेली विटंबना कबुलीजबाबात बोलून दाखवली, आपला मुलगा पूर्व पतीकडे न जाता कायम आपल्यासोबत असावा अशी हानाची इच्छा असताना तिने केलेल्या या कृत्यामुळे खुद्द पोलीस अधिकारी देखील चकित झाले.
हानाच्या पूर्व पतीने स्थानिक मीडियाला सांगितले की, जेव्हा तो आला तेव्हा पोलिसांनी त्याला त्याच्या मुलाचा मृतदेह पाहू दिला नाही. तो आणि हाना चार वर्षांपासून वेगळे राहत होते, आरोपी महिलेला तिच्या वडिलांकडून घर वारसा मिळाले होते आणि संपूर्ण कुटुंबाने तेथे येऊण राहावे अशी तिची इच्छा होती. पण जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा हानाच्या स्वतःच्या इच्छेनुसार हे नाते पूर्णपणे संपुष्टात आले. दरम्यान, घटस्फोटानंतरही तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण हानाने नकार दिला आणि ती जिद्दीवर राहिली.
आपल्या नवऱ्याविरुद्ध आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध ती यूसुफच्या मनात विष भरत होती. वकील समीर मोहम्मद सालेह यांनी सांगितले की, आरोपी महिलेच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव न येता, तिने पोलिसांना सांगितले की, 'मला आमच्या दोघांना मुक्त करायचे होते. मला त्याच्या वडिलांचा बदला घ्यायचा होता, आणि त्याच्यापासून त्याला वेगळे करायचे होते, त्याचे वडील सतत घरी येत होते आणि त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते.'
ताज्या बातम्या

Asian Games 2023 : भारताची आणखी एक सुवर्ण भरारी! 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

Asian Games 2023       10

सर्वात लोकप्रिय त्रिकूट - प्रसन्‍न, दिनार व श्रेयस यांचे 'शांतीत क्रांती सीझन 2'सह पुनरागमन: ट्रेलर रिलीज

   -         2

सोनी बीबीसी अर्थने मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये साजरा केला सायन्स फिल्म फेस्टिव्हल

ग्लेनमार्क लाइफसायन्सेसच्या 75 टक्के भागभांडवलची विक्री; निरमा कंपनी 5651 कोटींना करणार खरेदी

  75      5651

मुंबई, पुण्याला बसला सायबरधोक्‍यांचा सर्वाधिक फटका: QuickHeal

      QuickHeal

गोदरेज एयरतर्फे लालबागच्या राजाचा अनोखा अनुभव, सुगंध आणि तंत्रज्ञान असा झालाय मिलाप

IND vs AUS, 2nd ODI: ऑस्ट्रेलियाची बॅटिंग गडगडली, टीम इंडियाचा तब्बल 99 रन्सने विजय

IND vs AUS 2nd ODI       99

iPhone 15 मध्ये टाईप C चार्जिंग सुविधा, पण अँड्रॉईड केबलने चुकूनही करू नका चार्ज अन्यथा होईल पश्चाताप

iPhone 15   C
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited